शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

किराणा दरवाढीमुळे दिवाळीचा फराळ महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:09 AM

दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या डाळी, साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाठ वाढल्याने यंदा फराळ महागला आहे. महागाई नियंत्रणात आल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अनेक वस्तूंची दुपटीपेक्षा जास्त भाववाढ झालेली आहे.

नाशिक : दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या डाळी, साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाठ वाढल्याने यंदा फराळ महागला आहे. महागाई नियंत्रणात आल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अनेक वस्तूंची दुपटीपेक्षा जास्त भाववाढ झालेली आहे.  गतवर्षी दोन हजार रुपयांत झालेल्या फराळाच्या यादीकरिता यंदा किमान अडीच हजार रुपये मोजावे लागतील, अशी स्थिती आहे. किराणा दुकानात सामानाच्या यादीचे बिल पाहता यंदाची दिवाळी नक्कीच सर्वसामान्यांचं दिवाळं काढेल, असे चित्र आहे.  दीपोत्सवाचा सण म्हणून दिवाळी घराघरांत साजरी होते. हा सण हिवाळ्यात येणारा असल्याने या दिवसात शरीराला स्निग्धतेची गरज अधिक असते. या दिवसात पचनशक्तीही वाढत असते. त्यामुळेच मिष्टान्न, तेल-तुपात तळलेल्या वस्तू सहज पचतात यामुळे वर्षभरासाठीचे बळ मिळते. यामुळेच दिवाळीत सुकामेवा असलेल्या डाळीच्या पिठाचे लाडू, करंजी, अनारसे, चिवडा, शंकरपाळे यांसारख्या तूप-तेलात तळलेले पौष्टिक फराळ करण्याची परंपरा आहे. आजही घराघरांतून ती कायम आहे. दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली असून, फराळाचे पदार्थ तयार करण्यास घरोघरी सुरुवात होणार आहे. मात्र, यंदा फराळासाठी लागणाºया विविध वस्तूंच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट बसवताना कसरत होत आहे.किराणा मालाची १५ ते २५ टक्के भाववाढदिवाळीत भाजणी चकली आणि विविध गोडाचे पदार्थ करण्यासाठी लागणाºया विविध किराणा मालाच्या किमतीत गतवर्षीपेक्षा यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींसह रवा, मैदा आणि भाजके पोह्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत वाढल्याचे किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे शेखर दशपुते यांनी सांगितले. तर दिवाळी सणासोबतच हिवाळाही सुरू होत असल्याने या काळात स्निग्ध पदार्थांची गरज शरीराला अधिक भासते. पचनशक्तीही जास्त असते, त्यामुळे पौष्टिक, तेल-तुपाचे पदार्थांसोबत सुकामेव्याचे पदार्थही दिवाळसणाच्या निमित्ताने तयार केले जात आहेत.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार