शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 6:27 PM

दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देजनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

मानोरी : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाची घोषणा करून तीन महिने उलटले असूनही घोषणा केवळ तीन महिन्यांनंतर ही कागदावरच रेंगाळलेली असल्याने दुष्काळाची केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची मागणी होत असून, यात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.तसेच डोंगराळ भागातील प्राण्यांनादेखील पिण्यासाठी पाणी नसल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपासून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात हरणांचे कळप, मोरांचे कळप, वानर, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे कळप तसेच करकोचा नावाचे तब्बल १५०हून अधिक पक्ष्यांचे जाळे हरभरा पिकाच्या शेतात हिरवा हरभरा झाड खात असल्याचे दिसून आले आहे. करकोचे नावाचे पक्ष्यांचे हे भयाण जाळे बघण्यासाठी रस्त्याने जाणाºया वाहनचालकांना हा मनमोहक क्षण बघण्यासाठी आतुरतेने गाडी थांबून पाहत असतात.पुढच्या काही दिवसात उन्हाची तीव्रता अधिकच राहण्याची शक्यता असल्याने वन्यजीव प्राण्यांचे मोठे हाल होणार असल्याने वन्यप्राणी, पक्षी ग्रामीण भागात मानवी वस्तीकडे धाव घेऊन अन्नाच्या शोधात विसावलेले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातदेखील अपुºया पावसामुळे हिरवा चारा अल्पशा प्रमाणात असल्याने घरच्या गाईना हा चारा अपुरा पडत असल्याने वन्यप्राण्यांना हिरवा चारा शोधणे कठीण होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटून ही चारा छावण्या सुरू झालेल्या नसून परिणामी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ तर शेतकऱ्यांवर येणार नाही ना असा प्रश्न दुग्ध व्यावसायिक उपस्थित करत आहे.दरवर्षी पाऊस पडल्यावर मानोरी परिसरात हिरवा चारा, गवत खाण्यासाठी पडीत जनावरे मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत होते. परंतु यंदा हीच अवस्था बिकट झालेली असून, जनावरे चाºयाच्या शोधात पडीत जागेवरसुद्धा गवत मिळणे दुरापास्त झाल्याने महागडी जनावरे रास्त दराने विकण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ