गावागावात रंगू लागले निवडणुकीच्या गप्पांचे फड
By Admin | Updated: October 13, 2014 00:48 IST2014-10-12T22:00:02+5:302014-10-13T00:48:01+5:30
गावागावात रंगू लागले निवडणुकीच्या गप्पांचे फड

गावागावात रंगू लागले निवडणुकीच्या गप्पांचे फड
सिन्नर : विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान दोन दिवसांवर येऊन
ठेपले आहे. मतदानासाठी शासकीय यंत्रना सज्ज झाली असून, उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या भोंग्यांनी गावे ढवळून निघाली असून, तालुक्यातील गावागावात केवळ निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू लागले असल्याचे चित्र आहे.
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिके काढणीस तयार होऊ लागली आहे. अद्याप पिकांच्या काढणीस कालावधी असून, पिके निघाल्यावर रब्बी हंगामाची कामे सुरु होणार आहे. खरीप हंगाम उरकण्याच्या व रब्बी हंगाम सुरु होण्याच्या कालावधीतच निवडूक आल्याने शेतकऱ्यांना मोकळा वेळ मिळू लागला आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या विचारांचे, पक्षांचे व नेत्यांचे कार्यकर्ते हमखास दिसतात. त्यांनी आपापल्या नेत्यांचा प्रचार करताना आपलाच नेता कसा श्रेष्ठ असून तो कसा निवडूण येणार आहे याचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली असून, नेत्यांचे मार्केटिंग केले जात असल्याने याच एकमेव चर्चेवर गावागावतील पारांवर चर्चांना उत आला आहे. ग्रामपंचायत, विकास संस्थांच्या निवडणुकीपासून थेट लोकसभेच्या निवडणुकीतही गावगाड्यातील अठरापगड जातींच्या मतदारांवर सर्वच पक्षांचे व उमेदवारांचे लक्ष केंद्रित होत असते. त्यांचा विकास कसा केला अथवा कसे कल्याण केले जाणार आहे याबाबत पटवून दिले जाते. आपलाच उमेदवार चांगला असून, तोच निवडून येणार असल्याच्या चर्चेत गावात अनेकदा वादाचे व हमरीतुमरीचे प्रसंगी ओढवेले जाते. आपल्याला एकाच गावात रहायचे आहे कोणीही निवडून गेले तरी आपल्याला काही फरक पडणार आहे का, गड्या आपले काम आपणच केले तरच भाकर मिळणार आहे, असे म्हणून ज्येष्ठ वाद सोडवतात, प्रचाराच्या गाड्यांतून देण्यात येणाऱ्या घोषणा, भोंग्यांवर वाजवणारी गाणी, दाखविण्यात येणाऱ्या चित्रफिती यातून लहानथोरांची करमणूक होत आहे. गावांतील पारांवर रंगणाऱ्या गप्पा गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत जात असून, घरोघरी आता दूरचित्रवाणी संच झाल्याने देशासह जगातील घडामोडींची माहिती घरात बसून मिळू लागल्याने त्यावरही चर्चा झडत असतात. (वार्ताहर)