कडवा धरणात बुडून वृद्धाचा मृत्यू

By Admin | Updated: August 27, 2016 23:03 IST2016-08-27T23:01:00+5:302016-08-27T23:03:16+5:30

कडवा धरणात बुडून वृद्धाचा मृत्यू

Due to drowning, the death of old age | कडवा धरणात बुडून वृद्धाचा मृत्यू

कडवा धरणात बुडून वृद्धाचा मृत्यू

नाशिक : नातेवाइकांना भेटण्यासाठी गेलेल्या इगतपुरी तालुक्यातील निनावे येथील वृद्धाचा शनिवारी (दि़२७) सकाळी कडवा धरणात मृतदेह आढळून आला़ मयत वृद्धाचे नाव कारभारी संतू भगत असे आहे़
वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारभारी भगत हे मंगळवारी नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते़ मात्र, ते परत न आल्याने त्यांचा शोध सुरू होता़ दरम्यान, शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह निनावे शिवारातील कडवा धरणात तरंगताना आढळून आला़
याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार श्याम सोनवणे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Due to drowning, the death of old age