पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: September 5, 2015 22:03 IST2015-09-05T22:02:27+5:302015-09-05T22:03:43+5:30

पाणीटंचाई : मातीच्या बैलांची पूजा करण्याची वेळ

Due to drought on the hive | पोळ्यावर दुष्काळाचे सावट

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

येवला : येवला शहर व तालुक्यात वरूनराजाने पुरती पाठ फिरवल्याने भयावह दुष्काळीपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम पोळा सणावर झाला असून दिवसेंदिवस बाळीराजाकडील पशुधन कमी होऊ लागले आहे.शिवाय कुंभार समाज तयार करीत असलेल्या मातीच्या बैलावर दुष्काळाची छटा पसरली असून मातीच्या बैलांच्या मागणीत देखील घट झाली आहे.पोळा देखील आता ची मागणी घटली
शेतकर्याच्या दृष्टीने अति महत्वाचा पोळा हा सण यंदा श्रावणीशनीअमावासेला आला आहे.बळीराजा ज्याच्या जीवावर वर्षाभर मेहनतीची कामे करतो त्या बैलाचा सन मोठ्या आनंदाने साजरा करण्याची परंपरा आहे.शेतातल्या बैलांबरोबर मातीच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा महाराष्ट्रात घराघरात केली जाते.
यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीने हापकलेल्या शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष बैलाऐवजी मातीच्याच बैलांची पूजा करण्याची वेळ आली आहे. चारा नाही पाणी नाही जनावरे सांभाळायची कशी? अशातच महागाईमुळे त्रस्त झालेला बळीराजा केवळ आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. गरज पडेल तेंव्हा शेतीची यांत्रिक पद्धतीची साधने आणावी आण िमशागत करून शेती उभी करावी म्हणजे चार पाण्याचा प्रश्न उभा राहत नाही हि मानिसकता शेतकर्याची झाली आहे.येवला शहरात पिहला बैल पोळ्याचा मान येवल्याचे संस्थापक राजे रघुजी शिंदे यांचे वंशज अ‍ॅड.माणकिराव शिंदे यांच्या घराण्याला आहे.
येथील गंगादरवाजा भागातून बैल पोळ्याची मिरवणूक सालाबादप्रमाणे निघणार आहे. गेल्या २० वर्षीपूर्वी ३ तास चालणारी बैल पोळ्याची शहरातील बैल पोळ्याची मिरवणूक पशुधनाच्या कमी झालेल्या संख्येने केवळ एक तासात संपण्याचा अनुभव शहरवासीय घेत आहे.मागीलवर्षी उत्साहाच्या वातावरणात मिरवणुकीत केवळ ६० ते ७० बैल सहभागी झाले होते.
दुष्काळी परिस्थितीने यंदा बैलांची संख्या मोठ्याप्रमाणावर कमी झाली आहे.मातीच्या बैलांच्या पूजेला सर्वत्र फार महत्व आहे,यासाठी शहरासह ग्रामीण भागात मातीचे बैल तयार करण्याचा उद्योग 15 दिवस आगोदर सुरु होत असला तरी यंदा फारसा उठाव मातीच्या बैल मागणीला नाही असे मातीबैल तयार करणार्या गंगादरवाजा भागातील सोनवणे कुटुंबाचे म्हणणे आहे.एका देखण्या बैलजोडीची
किंमत सुमारे ४० ते ५० रु पये आहे.साधे बैल १५ ते २० रु पयात ५ नग विकावे लागतात.असा अनुभव सोनवणे यांनी सांगितला. (वार्ताहर)

Web Title: Due to drought on the hive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.