दुष्काळामुळे दिवाळी निरुत्साहात

By Admin | Updated: November 16, 2015 00:34 IST2015-11-16T00:33:47+5:302015-11-16T00:34:18+5:30

दुष्काळामुळे दिवाळी निरुत्साहात

Due to drought, discourage Diwali | दुष्काळामुळे दिवाळी निरुत्साहात

दुष्काळामुळे दिवाळी निरुत्साहात

खामखेडा : चालू वर्षी दुष्काळजन्य परिस्थिति असल्याने खामखेडा परिसरात दिपावलीचा सण निरू उत्साहात साजरी करण्यात आली दिपावलीचा सण म्हटला की खर्च जास्त प्रमाणात असतो. दीपावली या सणाला फार मोठे महत्वाचे स्थान आहे.
दरवर्षी या सणाच्या आदि शेतकरया जवळ खरीपा पिकाचा पैसा हाती आलेला असतो. खरीप पिकातील मका बाजरी लाल कांदा या पिका बाजारात विक्रीसाठी तयार झालेला असतो. त्यामुळे शेतकर्यांच्या हाती दीपावली सणासाठी खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध झालेला असतो. परंतु गेल्या दोन-वर्षापासून उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे कांदा बियाणाचे ढोगळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या बियाणाची कमतरता निर्माण झाली.
उशीरा पावसामुळे खरीप पिकांची पेरणी उशीरा तर झालीच, त्यातल्यात्यात मघ्यंतरी पाऊसाने ओढ दिल्याने खरीपाचे पिके पाण्याअभावी वाढ झाली नाही. त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात घट झाली.
तसेच चालु वर्षी उशीरा पावसामुळे खरीप पिकांची पेरणी वेळेवर झाली नाही.
पेरणी केलेली पीके जोमात असताना पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या उत्पादनात घट
झाली. बियाणे अभावी लाल कांद्याचे बियाणे उशीरा टाकल्यामुळे कांदा लागवड उशीरा
झाल्यामुळे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कांदा बाजारात न गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने त्याचा परिणाम दिपावली सणावर झाल्याने ,जो दरवर्षी मोठ्या आनंदाने चार पैसे खर्च करू साजरी करीत होता टी या वर्षी करता आली नाही. (वार्ताहार)

Web Title: Due to drought, discourage Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.