वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 06:53 PM2020-12-28T18:53:20+5:302020-12-28T18:54:27+5:30

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.

Due to a dispute between the vehicle owners, the vehicle was parked horizontally on the state highway | वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : भाजीपाला व्यवसायिक-वाहनधारकांचे वाद पुन्हा चव्हाट्यावर

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.

शिर्डी सुरत राज्य महामार्गाच्या व राष्ट्रीय महार्गाच्या वणी चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गाडी उभी करण्यावरून वाद सुरू झाले त्यामुळे तेथील एका वाहनधारकांने थेट आपली पिकप गाडी राज्यमहार्गावर आडवी लावली, त्यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. यावर स्थानिक नागरिकांनी गाडी काढण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यावर त्यांनाच धक्काबुक्की करत वाद घातले. त्यामुळे येथील वाहनधारकाची गुंडागिरी चव्हाट्यावर आली असून प्रशासनाने त्यांना आवर घालावा अन्यथा शहरात हे वाहनधारक छोट्या छोट्या वादातून मोठे प्रकरण घडू शकते, अशी चर्चा पिरसरातील नागरीक व वाहनधारक करीत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग गेल्याने शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच द्राक्ष, टोमॅटो व कांद्याची मोठी मंडी असल्याने परराज्यातून हजारो व्यापारी, कामगार आणि वाहनांनामुळे शहर चोवीस तास गजबलेले असते. मात्र चौकाचौकात सुरु झालेल्या भाजीपाला विक्रीमुळे वाहनांची कोंडी होऊन शहरात चक्का जाम होत आहे. तरीही प्रशासन गप्प आहे, परिणामी वाहन धारकांनामध्ये वाद होऊन शहरात गोंधळ निर्माण होत आहे .त्याकरीता प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा व चौका चौकातील अनधिकृत गर्दी कमी करावी अशी विनंती करण्यात आली.

आठवडे बाजार सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात दररोज सुरू केलेला चौकाचौकातील भाजीपाला व्यवसाय बंद करावा म्हणजे शहरात होणारा गोंधळ तरी कमी होईल .
- गणेश तिडके, पिंपळगाव बसवंत.

वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणार
वणी चौफुलीवर अनधिकृत टपऱ्या व भाजीपाला विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असून याबत वरिष्ठस्थरावर पाठपुरावा केला जात आहे. लवकरच उड्डाणपुलाखालील अनधिकृत व्यावसायिकांना चाप बसेल.
- नवनाथ केदारे, टोल नाका व्यवस्थापक.

वणी चौफुलीवरील गोंधळ थांबवा
पिंपळगाव बसवंत येथील वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेत्यांची दादागिरी तसेच उड्डाणपुलाखाली टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन सात्यताने अपघात घडत असल्याने या घटनांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत आहे.त्यामुळे येथील गोंधळ थांबवा
- राजाभाऊ सोनवणे, अध्यक्ष, शिववाहतुक सेना.

Web Title: Due to a dispute between the vehicle owners, the vehicle was parked horizontally on the state highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.