शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाटावरील अस्वच्छतेमुळे आयुक्त तुकाराम मुंढे संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:09 IST

पाहणी दौरा : आरोग्य विभागाला घेतले फैलावर

ठळक मुद्दे महाशिवरात्रीची सुटी असतानाही मंगळवारी (दि.१३) गोदाघाटावर पाहणी दौरा केल्याने अधिकारी वर्गाची धावपळस्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणा-या ‘प्रोजेक्ट गोदा’चीही त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाशिवरात्रीची सुटी असतानाही मंगळवारी (दि.१३) गोदाघाटावर पाहणी दौरा केल्याने अधिकारी वर्गाची धावपळ उडाली. गोदाघाटासह नदी पात्रालगत ठिकठिकाणी घडलेल्या अस्वच्छतेच्या दर्शनामुळे आयुक्त संतप्त झाले आणि त्यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. दरम्यान, स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणा-या ‘प्रोजेक्ट गोदा’चीही त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती जाणून घेतली.आयुक्तांनी सकाळी रामवाडी पूल, गोदा पार्क, गांधी तलाव, अहल्यादेवी होळकर पूल, रामकुंड, दुतोंड्या मारूती परिसर ,रामसेतू, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, काझी गढी, संत गाडगेबाबा वसाहत, टाळकुटे पूल या परिसराची पाहणी करत विविध समस्या जाणून घेतल्या. गांधीतलाव, रामकुंड परिसरात घाण-कचरा आढळून आल्याने त्यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना फैलावर घेतले आणि येत्या २५ दिवसात संपूर्ण साफसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी रामवाडी पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत तसेच गंगापूल मलनि:स्सारण केंद्राचीही पाहणी करत कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली. याचवेळी, जॉगिंग ट्रॅकलगत त्यांना चेंबरमध्ये पिंपळाचे एक छोटे झाड वाढल्याचे दिसल्याने आयुक्त संतप्त झाले आणि त्याबाबतही त्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत कंपनीने ‘प्रोजेक्ट गोदा’ राबविण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भातील प्रकल्पांची माहिती त्यांनी कंपनीच्या अधिका-यांकडून जाणून घेतली. सदर प्रकल्पांबाबतची थ्रीडी इमेज सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना केल्या आणि प्रकल्पांना गति देण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या गरजेनुसारच कामे होणार असल्याचेही त्यांनी संबंधित अधिका-यांना सुनावले. या पाहणी दौ-याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर,आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बुकाने, कार्यकारी अभियंता संजय घुगे, एस. एम. चव्हाणके,उदय धर्माधिकारी , पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी,विभागीय अधिकारी नितीन नेर,बी. वाय. शिंगाडे, निर्मला गायकवाड यांचेसह स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.खासगी प्लॉटबद्दल अधिकारी अनभिज्ञआयुक्तांनी गोदाघाटावरील सुलभ शौचालयालगत असलेल्या घाण-कच-याबाबत आरोग्य विभागाला जाब विचारला. त्यानंतर, त्यांना एका मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकल्याचे निदर्शनास आले. सदर प्लॉट मनपाच्या मालकीचा आहे काय, अशी विचारणा त्यांनी अधिका-यांना केली परंतु, एकालाही त्याचे उत्तर देता आले नाही. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीच्या एक महिला अधिकारी पुढे आल्या आणि सदर प्लॉट एका बांधकाम व्यावसायिकाचा असल्याचे सांगितले. आयुक्तांनी सदर प्लॉटवरील डेब्रीज उचलून घेण्यासंबंधी नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे