शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेतील अनुदानाच्या विलंबामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 15:09 IST

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्याच्या लक्ष्य समोर ठेवले असून त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुटुंबासाठी पहिले घर खरेदी करणाºया ग्राहकांना २ लाख  ६७ हजार अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे.  परंतु, कर्जप्रकरण मंजुर झाल्यानंतर तब्बल सहामहिने ते वर्षभराच्या कालावधीपर्यंत अनुदानाची रक्कम ग्राहकांना प्राप्त होत नसल्याने सरकारकडून मिळणाºया अनुदानाच्या रक्कमेवरही ग्राहकांना व्याजाचा भूर्दंड भरावा लागत आहे.   

ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजनेते अनुदान मिळण्याची ग्राहकांना प्रतिक्षाकर्जप्राप्तीनंतर तीन महिने उलटूनही लाभार्थी अनुदानापासून वंचित

 नाशिक : केंद्र सरकारने २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्याच्या लक्ष्य समोर ठेवले असून त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुटुंबासाठी पहिले घर खरेदी करणाºया ग्राहकांना २ लाख  ६७ हजार अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे.  परंतु, कर्जप्रकरण मंजुर झाल्यानंतर तब्बल सहामहिने ते वर्षभराच्या कालावधीपर्यंत अनुदानाची रक्कम ग्राहकांना प्राप्त होत नसल्याने सरकारकडून मिळणाºया अनुदानाच्या रक्कमेवरही ग्राहकांना व्याजाचा भूर्दंड भरावा लागत आहे.   बांधाकाम क्षेत्रात मंदीचे सावट असताना केंद्र सरकारने आणलेली पंतप्रधान आवास योजना बांधकाम उद्योगाला उभारी ठरली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी २ लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात घर खरेदीला प्राधान्य दिले. परंतु, घर खरेदी केल्यानंतर सहा महिने ते वर्षभराचा कालावधी उलटूनही ग्राहकांच्या खात्यावर पंतप्रधान अवास योजनेचे अनुदान जमा झालेले नाही. दुसरीकडे घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाचे हप्ते सुरु झालेले असताना ग्राहकांना संपूर्ण कर्जाच्या रक्कमेवर व्याजदरासह हप्ते भरावे लागत असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांना आार्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून या योजनेचा ग्राहकांपेक्षा बँकांनाच अधिक फायदा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.    

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी  पंतप्रधान अवास योजनेअंतर्गत नाशिकमधून सर्वाधिक लाभार्थ्यांनी गृहखरेदीचा लाभ घेतल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सत्कार व सन्मान करण्यात आला. परंतु,  या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यास पात्र असलेल्या ग्राहकांना अद्यापही अनुदानाची प्रतिक्षा असून प्रशासनाकडून याविषयी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाNashikनाशिकHomeघरbankबँकbankबँकconsumerग्राहक