वालदेवी-दारणा नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: December 25, 2015 23:36 IST2015-12-25T23:34:47+5:302015-12-25T23:36:23+5:30
वालदेवी-दारणा नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू

वालदेवी-दारणा नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू
नाशिक : गत पाच दिवसांपासून वृद्धाश्रमातून बेपत्ता असलेले व खेकडी पकडण्यासाठी गेलेल्या अशा दोघांचा वालदेवी - गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे़ या प्रकरणी उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
देवळाली कॅम्प लॅमरोडवरील राधाकेशव चॅरिटेबल ट्रस्टमधील ७५ वर्षीय प्रदीप बच्चूभाई पारी हे पाच दिवसांपुर्वी मुलाला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते़ मात्र मुलाकडे न पोहोचल्याने तसेच त्यांचा शोध न लागल्याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती़ दरम्यान, शुक्रवारी (दि़२५) त्यांचा मृतदेह दारणा नदीपात्रात आढळून आला़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस नाईक एस़ पी़ घुगे करीत आहेत़ या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दुसरी घटना
वालदेवी नदीपात्रातदुसरी घटना घडली आहे़ विहितगाव येथील तुळशीराम मोतीराम झोंबाड (३५) हे गुरुवारी (दि़२४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या एका मित्रासह खेकडे पकडण्यासाठी वालदेवी नदीपात्रात गेले होते़ खेकडे पकडत असताना तोल गेल्याने ते पाण्यात बुडाले व बेपत्ता झाले़ दरम्यान, ही माहिती मित्राने दिल्यानंतर स्थानिक नागरिक व अग्निशमन विभागाने गुरुवारी दिवसभर त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत़ शुक्रवारी (दि़२५) सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला़