विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या तिघांना कोठडी

By Admin | Updated: May 13, 2014 00:19 IST2014-05-13T00:19:42+5:302014-05-13T00:19:42+5:30

चांदवड : येथील श्रीरामरोडवरील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सौ. रुपाली गोरख सूर्यवंशी (२६) या विवाहितेच्या मृत्यू

Due to the death of a married man, | विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या तिघांना कोठडी

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या तिघांना कोठडी

 चांदवड : येथील श्रीरामरोडवरील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सौ. रुपाली गोरख सूर्यवंशी (२६) या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी अटक केलेले पती गोरख दीपक सूर्यवंशी, सासू सौ. शोभा दीपक सूर्यवंशी, सासरे दीपक रतन सूर्यवंशी यांच्यावर चांदवड पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला करुन चांदवड न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.बी.गिरी यांच्या समोर उभे केले असता त्यांना गुरुवार, दि. १५ मेपावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर हे करीत आहेत. दीर योेगेश सूर्यवंशी हा फरार आहे. त्याचा पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Due to the death of a married man,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.