नागापूरला दर्शनासाठी गर्दी

By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-11T21:19:08+5:302014-08-13T00:45:41+5:30

नागापूरला दर्शनासाठी गर्दी

Due to crowd watching Nagapur | नागापूरला दर्शनासाठी गर्दी

नागापूरला दर्शनासाठी गर्दी

 

मनमाड : शहर व परिसरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती.
शहरातील पुरातन संगमेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, तर नागापूर येथील पुरातन नागेश्वर मंदिंरात यात्रेनिमित्त दर्शनासाठी तालुक्यातून भाविक आले होते.
मनमाडपासून जवळच असलेल्या नागापूर येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अनेक भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याने भाविकांना दोन तास रांगेत उभे रहावे लागत होते. मनमाड येथून नागापूर येथे जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत बससेवेचे व मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील विविध महादेव मंदिरांत, चांदवड रोडवरील सगळे मळ्यातील महादेव मंदिरात तसेच मनमाड-येवला रोडवर कॅम्प विभागातील श्री महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Due to crowd watching Nagapur