शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कपाटकोंडीमुळे स्थायीच्या सभापतींचीच कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:00 AM

कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटरचे करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्तांच्या प्रस्तावात सोयीचे बदल करण्याऐवजी गैरसोयीचे बदल केल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांना पक्षाने स्थानिक स्तरावर जाब विचारला आहे. इतकेच नव्हे तर आता इतिवृत्तात ती चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे.

नाशिक : कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटरचे करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्तांच्या प्रस्तावात सोयीचे बदल करण्याऐवजी गैरसोयीचे बदल केल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांना पक्षाने स्थानिक स्तरावर जाब विचारला आहे. इतकेच नव्हे तर आता इतिवृत्तात ती चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे.  शहरातील कपाटकोेंडीमुळे अडचणीत आलेल्या इमारती मुक्त करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कलम २१०चा वापर करून शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्यासाठी मिळकतधारकांना आवाहन करायचे आणि जे मिळकतधारक त्याला प्रतिसाद देतील त्यांना भविष्यात सर्वच रस्ता नऊ मीटर होईल या अपेक्षेवर तीस टक्के अतिरिक्तचटई क्षेत्र देण्याचा प्रस्ताव मांडला होता. गेल्या ६ जुलैस हा ठराव मंजूर झाला खरा, मात्र या प्रस्तावात एक वर्ष मुदतीसाठी ही सवलत योजना असल्याचा उल्लेख करू नये तसेच स्थायी समितीवर वेळोवळी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याची तरतूद करून अधिकार आयुक्तांऐवजी स्थायी समितीकडे घेण्याची सूचना सभापती हिमगौरी आडके यांना करण्यात आली होती, असे सांगण्यात आले. त्यांनी मात्र आयुक्तांचा प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर करून त्यांच्याकडे पाठवून दिला. त्यावर सूचक व अनुमोदक म्हणून उद्धव निमसे व भाग्यश्री ढोमसे यांच्या सह्या आहेत. याप्रकारामुळे भाजपात अंतर्गत वादंग सुरू झाले. त्यातच अन्य अनेक विषय तहकूब ठेवण्याचे पक्षाच्या अंतर्गत बैठकीत ठरले असताना आडके यांनी ते मंजूर केल्याने भाजपासह १२ सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन निर्णय मान्य नसल्याचे कळविले आहे.  दरम्यान, कपाटकोंडीच्या निमित्ताने रस्ता रुंदीकरणाबाबतचा ठराव परस्पर केल्याप्रकरणी सभापती हिमगौरी आडके यांना जाब विचारण्यासाठी शनिवारी (दि. २१) वसंत स्मृती येथे समितीचे नऊ सदस्य आणि गटनेत्यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी आडके यांना जाब विचारण्यात आला. त्याचप्रमाणे आता सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी आल्यानंतर त्यात बदल करून ठराव पाठविण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. याशिवाय यापुढे ठरावांचे सूचक आणि अनुमोदक म्हणून दिनकर पाटील व उध्दव निमसे यांना अधिकार देण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपातील अंतर्गत वाद हा पालिकात वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.आता संघामार्फत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीआयुक्त तुकाराम मुंढे आणि स्थानिक भाजपातील अंतर्गत संघर्ष अधिक उफाळून आला आहे. करवाढ रद्द करण्याच्या विरोधात महासभेत केलेला ठराव आयुक्तांनी फेटाळून लावल्याने भाजपाचे पदाधिकारी अधिक संतप्त झाले आहेत. शनिवारी (दि. २१)राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या काही ज्येष्ठ स्वयंसेवकांना वसंत स्मृती येथे पाचारण करून मुंढे यांच्या कामगिरीविषयी तक्रारी करण्यात आल्याचे समजते. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पक्षाचे नगरसेवक निवडूनही येणार नाही असे सांगतानाच या विषयावर तातडीने तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने सोमवारी बैठक बोलवावी अन्यथा आयुक्तांच्या विरोधात पुढील आठवड्यात विशेष महासभा बोलविण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका