वणीत बॉम्बनाशक वाहन आल्याने घबराट

By Admin | Updated: April 15, 2015 00:06 IST2015-04-15T00:06:44+5:302015-04-15T00:06:44+5:30

वणीत बॉम्बनाशक वाहन आल्याने घबराट

Due to coming Vanani bombardier vehicle | वणीत बॉम्बनाशक वाहन आल्याने घबराट

वणीत बॉम्बनाशक वाहन आल्याने घबराट



वणी : गावातील प्रमुख मार्गावरून बॉम्बनाशक वाहनाने मार्गक्रमन केल्याने काही अघटीत झाले की काय, कोठे बॉम्ब सापडला काय, अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. तसेच घबराट निर्माण झाली होती.
आठवडे बाजार असल्यामुळे गावात नागरिकांची गर्दी होती. जगदंबा देवी मंदिर परिसरात चैत्र यात्रोत्सव सुरू असल्याने व मंगळवार असल्याने भाविकांची गर्दी होती.
पथकाच्या वाहनाने प्रवेश केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे यांना याबाबत विचारणा केली असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या आदेशान्वये मिरवणूक मार्गाची माहिती घेण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर वाहन आल्याचे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Due to coming Vanani bombardier vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.