भऊर : दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेल्या उन्हाळ कांद्याच्या भावामुळे देवळा तालुक्यातील कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पुढील पिकांचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, खामखेडा, सावकी, वरवंडी, लोहोणेर आदि गावांच्या परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड व साठवणूक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर केली जाते. चालू वर्षीही या परिसरातील कांदा उत्पादकांनी महागडे बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करु न कांद्याचे ऊत्पादन घेऊन कांदा चाळीत साठवून ठेवला. गतवर्षी उशिरा विक्र ी केलेल्या कांदा ऊत्पादकांना चांगला बाजारभाव मिळाला होता. त्याप्रमाणे यावर्षीही चाळीत साठवलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; पण सध्या दिवसेंदिवस भाव कमी कमी होत असल्यामुळे कांदा उत्पादकांचा अपेक्षाभंग होत असल्याचे चित्र आहे.
कांदा भाव कोसळल्याने नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:08 IST