मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:50 IST2020-12-23T21:04:25+5:302020-12-24T00:50:35+5:30
नाशिक : दौंड-अहमदनगर दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलला
नाशिक : दौंड-अहमदनगर दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दौंड-अहमदनगर या दरम्यान, मालगाडीचे डबे घसरल्याने झालेल्या या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने, ०२११७ पुणे-अमरावती स्पेशल, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, ०२०१६ पुणे-मुंबई स्पेशल प्रस्थान व ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल याचबरोबर पुणे-लोणावळा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे गाड्या वळविण्यात आल्या. या गाड्यांमध्ये - हजरत निजामुद्दीन स्पेशल, ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, ००१०३ सांगोला-नरखेर किसान स्पेशल, ०६२२९ म्हैसूर-वाराणसी स्पेशल, ०६५२७ बेंगलुरू-हजरत निजामुद्दीन स्पेशल, ०२१४९ पुणे-दानापूर स्पेशल यांचा समावेश आहे.
मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल, ०६५२४ हजरत निजामुद्दीन-येसवंतपूर स्पेशल, ०२१५० दानापूर-पुणे स्पेशल, ०६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर स्पेशल, ०१०७८ जम्मू तवी-पुणे स्पेशल, ०२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को स्पेशल, ०२२२४ अजनी-पुणे स्पेशल, ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशल तसेच ०२१५० दानापूर-पुणे स्पेशल या गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
०६५२८ हजरत निजामुद्दीन-बेंगलुरू ही गाडी खंडवा-अंकई-पूर्णा-परभणी लातूर रोड-कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात आली आहे.