भाव कोसळल्याने मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 15:57 IST2017-11-27T15:57:03+5:302017-11-27T15:57:24+5:30

कसबे सुकेणे: - गेल्या दोन दिवसापासुन मेथीच्या भाजीचे बाजारभाव सातत्याने कोसळत असुन आज सोमवारी १०० रूपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतक-यांनी मेथीच्या जुडया रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला.

Due to the collapse, the fenugreek is thrown in the road | भाव कोसळल्याने मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकल्या

भाव कोसळल्याने मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकल्या

कसबे सुकेणे: - गेल्या दोन दिवसापासुन मेथीच्या भाजीचे बाजारभाव सातत्याने कोसळत असुन आज सोमवारी १०० रूपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतक-यांनी मेथीच्या जुडया रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला.
नाशिक, वाशी या मोठया भाजीपाला बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक सुरू झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चांगला बाजार भाव असलेल्या मेथीची आवक वाढल्याने रविवारपासुन मेथीचे भाव गडगडण्यास प्रारंभ झाला. सोमवारी १०० रूपये शेकडा बाजारभाव मेथीला मिळाल्याने शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या गावांतुन नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची मोठया प्रमाणात आवक होती. भाव कोसळल्याने मेथीच्या जुडया रस्त्यावर ओतुन शेतक-यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. मेथीला एकरी वीस हजार रूपये खर्च येतो. परंतु १०० रूपये शेकडा भाव म्हणजे प्रति नाशिक जुडी एक रूपया असा भाव मिळाला तर शेतक-यांना इतर उत्पादन खर्च तर दुरच परंतु भाजी काढण्याची मजुरी सुटत नसल्याची खंत शेतक-यांनी व्यक्त केली.

Web Title: Due to the collapse, the fenugreek is thrown in the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.