ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

By Admin | Updated: January 1, 2015 01:35 IST2015-01-01T01:33:49+5:302015-01-01T01:35:29+5:30

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

Due to cloudy weather, grape growers are worried | ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

वणी : ढगाळ हवामान व थंडी यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, असे वातावरण द्राक्षबागांसाठी प्रतिकूल मानण्यात येत आहे.
वणी व परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान व थंडी असे वातावरण होते. द्राक्षांवर भुरा व डावणी रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधित महागड्या औषधांची फवारणी द्राक्षबागांवर करावी लागते आहे.
दरम्यान, असे वातावरण व त्यात पावसाचा अंदाज जाणकारांनी वर्तविल्याने अशी स्थिती निर्माण झाली तर काय करायचे हा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to cloudy weather, grape growers are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.