वाजगाव येथील जनता विद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:59 PM2019-07-10T14:59:44+5:302019-07-10T14:59:51+5:30

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील जनता विद्यालय १५जून रोजी शाळा उघडल्यापासून बंद असल्यामुळे पालक त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. यामुळे पालकविद्यार्थ्यांचे दाखले परत करण्याची मागणी करत आहेत.

 Due to the closure of Janata Vidyalaya in Vajagga, the loss of the students | वाजगाव येथील जनता विद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थांचे नुकसान

वाजगाव येथील जनता विद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थांचे नुकसान

Next
ठळक मुद्दे विद्यालयात योग्य त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही संबंधित संस्थाचालक दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांनी गतवर्षी या शाळेत सुधारणा न झाल्यास हि शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात यावी असा ठराव वाज


देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील जनता विद्यालय १५जून रोजी शाळा उघडल्यापासून बंद असल्यामुळे पालक त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. यामुळे पालकविद्यार्थ्यांचे दाखले परत करण्याची मागणी करत आहेत.
नासिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाणा या संस्थेने सन २००९मध्ये वाजगाव येथे जनता विद्यालय सुरू केले होते. गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंतची शिक्षणाची सोय असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना देवळा, खर्डा, रामेश्वर आदी गावात पुढील शिक्षणासाठी जावे लागत होते. गावातीला आदीवासी विद्यार्थ्यांना मात्र इतर गावात शिक्षणासाठी जाणे आर्थिकदृष्टया गैरसोयीचे ठरू लागल्यामुळे हे विद्यार्थी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेउन पुढे शाळा सोडुन देत. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.विधायक कार्यसमितीने वाजगाव येथे जनता विद्यालय सुरू केल्यामुळे इयत्ता आठवी ते दहा वी पर्यंत गावात शिक्षणाची सोय झाली. गावकº्यांनी शाळेला वर्गखोल्यांसाठी गावातील समाज मंदीर, व ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची जागा उपलब्ध करून दिली. शाळेला पालकांनी चांगला प्रतिसाद देत आपले पाल्य शाळेत दाखल केले. सुरु वातीला तीन तुकडयांची मिळून एकूण ८०च्या आसपास पटसंख्या होती. सन२०१०/११ मध्ये एस.एस.सी. बोर्डाने शाळेला सांख्येतांक दिला आहे. त्या वेळेस संस्था विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवेल व दर्जेदार शिक्षण मिळेल अशा अपेक्षेत पालक होते. परंतु कालांतराने पालकांचा भ्रमनिरास झाला. विधायक कार्य समितीने शाळेच्या सुधारणेच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत.विनाअनुदानित असलेल्या या शाळेत गतवर्षी अवघे दोन शिक्षक होते. हे दोन शिक्षक तिनही इयत्तांना गणित, विज्ञान, मराठी व समाजशास्त्र हे विषय शिकवत. सद्या शाळेला एकच शिक्षक असल्याची माहीती मिळाली. पेसा अंतर्गत येणाº्या ंया शाळेत पाच शिक्षकांची आवश्यकता आहे. संस्थेच्या खर्डा येथील शाळेतील शिक्षक हिंदी, इंग्रजी विषयांचे आठवडाभरात काही तास घेण्यापुरते तात्पुरती वाजगाव येथील शाळेत हजेरी लावत वेळ निभावून नेतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होउ लागल्यामुळे पालकांनी आपले पाल्य या शाळेत पाठवण्याऐवजी इतर शाळांत दाखल करण्यास सुरु वात केली. यामुळे शाळेतीत विद्यार्थी संख्या रोडावू लागली. शाळेत सद्या आदीवासी, व इतर मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची पटसंख्या ५०च्या आत आहे. हे आदीवासी विद्यार्थी शाळा बंद पडल्यामुळे शिक्षण घेण्यापासून वंचित झाले आहेत. पालक शाळा बंद असल्यामुळे शाळे शेजारी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात शाळा कधी सुरू होणार? याबाबत चौकशी करताना दिसतात.
*****
फोटो - वाजगाव येथे१५जून रोजी शाळा उघडल्यापासून अद्यापपर्यंत बंद असलेल्या शाळेमुळे विद्याथ्र्यांचे शालेय नुकसान होत आहे.(10देवळा वाजगाव स्कूल)

Web Title:  Due to the closure of Janata Vidyalaya in Vajagga, the loss of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.