दूरध्वनी खंडित होत असल्याने देवळ्यातील नागरिक त्रस्त

By Admin | Updated: August 8, 2014 00:58 IST2014-08-05T22:22:23+5:302014-08-08T00:58:57+5:30

दूरध्वनी खंडित होत असल्याने देवळ्यातील नागरिक त्रस्त

Due to the breaking of the telephone, the temple dwellers suffer | दूरध्वनी खंडित होत असल्याने देवळ्यातील नागरिक त्रस्त

दूरध्वनी खंडित होत असल्याने देवळ्यातील नागरिक त्रस्त

 

देवळा : देवळा तालुक्यात भारत संचार निगमची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असल्याने तसेच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने याबाबत संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला असून, तशा आशयाचे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
देवळा तालुक्यात बीएसएनएलचे कृषिकार्डधारक मोठ्या प्रमाणात असूनही त्यांना देयके भरण्यासाठी खूप कमी कालावधी मिळतो. यामुळे ग्राहकांची दूरध्वनी सेवा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडतात. बीएसएनएलची देयके उशिरा प्राप्त होत असल्याने ग्राहक देयकांबाबत अनभिज्ञ असल्याने व पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केल्यानंतर बेजबाबदार व उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत बीएसएनएलने त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दूरध्वनीचे देयके किमान १५ दिवस आधी सेवा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना प्राप्त व्हावे, तसेच वारंवार खंडित होणारी बीएसएनएलची सेवा करावी व जनतेला दिलासा द्यावा आदि मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या असून, याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आलेला आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the breaking of the telephone, the temple dwellers suffer