भुजबळ यांच्यामुळे संधी हुकली - दराडे
By Admin | Updated: September 28, 2014 23:28 IST2014-09-28T23:28:15+5:302014-09-28T23:28:34+5:30
भुजबळ यांच्यामुळे संधी हुकली - दराडे

भुजबळ यांच्यामुळे संधी हुकली - दराडे
येवला : लोकसभा निवडणुकीने सारी समीकरणे बदलली व भुजबळ पुन्हा येवल्यात आले आणि आमची संधी हुकली. आता समर्थकांचा भरवसा जिकडे,तिकडे मदत असे सूत्र ठरवले असुन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेंद्र दराडे यांनी पत्रकार परिषदे दिली.
दराडे म्हणाले, येवला विधानसभेची कॉंग्रेसची हक्काची जागा २००४ ला मतदार संघांची अदलाबदल करण्याच्या चालीत राष्ट्रवादीने हिसकावून घेत माझ्या आमदारकीला ग्रहण लागले भाजपा सेनेच्या वाटेवर गेलो. पण संभाजी पवारांनी पाय रोवले त्यात आता युती तुटली. सारे काही जागेवर राहिले . मानाचे पान देऊ सेनेत या असे निमंत्रणही सेनेने दिले होते.असे त्यांनी सांगितले. येवल्याची जागा भाजपला सोडावी यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केला. पण अखेर युती तुटली आणि आम्ही देखील थांबण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार कल्याणराव पाटील आणि मी बरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. आता उमेदवारीची स्पर्धा संपली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच युतीची पायरी चढण्याचा निर्णय घेतला होता. आता काय करायचे याचा निर्णय देखील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर करणार असल्याचे दराडे म्हणाले .कॉंग्रेसची उमेदवारी घ्यावी म्हणून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा फोन आला होता पण सध्या राष्ट्रवादीत सर्व पुर्वाश्रमीचे कार्यकर्ते असल्याने त्यांची मानिसकता बदलण्याचे आव्हान स्वीकारून उमेदवारी करणे शक्य नसल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.सुधीर जाधव, जगदंबा शिक्षण संस्थेचे किशोर दराडे, कुणाल दराडे उपस्थित होते.