नवरात्रोत्सवातही डीजेवर बंदी

By Admin | Updated: September 29, 2016 00:39 IST2016-09-29T00:38:27+5:302016-09-29T00:39:01+5:30

आयुक्तांचे आदेश : डीजे लावल्यास होणार कारवाई

Due to ban on Navratri | नवरात्रोत्सवातही डीजेवर बंदी

नवरात्रोत्सवातही डीजेवर बंदी

नाशिक : नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून शहरात मंडळांच्या तयारीलाही वेग आला आहे़ नवरात्रोत्सवात गणेशोत्सवाप्रमाणे डीजेवर बंदी कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केले आहे़ त्यामुळे डीजेचा वापर करणारे तसेच ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्या देवी मंडळांना पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे़
गणेशोत्सवाप्रमाणेच शहरात नवरात्रोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो़ या उत्सवासाठी मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे़ तर पोलीस प्रशासनाकडून पोलीस ठाणेनिहाय बैठका घेऊन या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे़ या सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडळांना परवानगी नाकारली जाणार आहे़
न्यायालयाने गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ध्वनिमर्यादा घालून दिल्या आहेत़ या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पोलीस तसेच महापालिका अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार गणेशोत्सवात मंडळांवर अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या मंडळांनाच परवानगी देण्यात आली होती़ त्यानुसार नवरात्रोत्सवातही या अटी व शर्ती कायम असणार आहेत. गणेशोत्सवात डीजे लावून ध्वनिमर्यादा न पाळणाऱ्या ३४ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते़ या गुन्ह्यासाठी पाच लाख रुपयांचा दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे़ त्यामुळे देवी मंडळांनी ध्वनिमर्यादा व पोलिसांच्या सूचनांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन पोलिसांतर्फे केले जाते आहे़ (प्रतिनिधी)
 

Web Title: Due to ban on Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.