डिटीएड प्रथम वर्ष अर्ज विक्री,
By Admin | Updated: June 3, 2014 00:53 IST2014-06-03T00:14:27+5:302014-06-03T00:53:28+5:30
स्वीकृती सुरू : शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी अध्यापन पदविका (डिटीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातून आवेदनपत्राची विक्री प्रत्येक डिटीएड विद्यालयात सुरू करण्यात आली आहे,

डिटीएड प्रथम वर्ष अर्ज विक्री,
नाशिक : स्वीकृती सुरू : शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी अध्यापन पदविका (डिटीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातून आवेदनपत्राची विक्री प्रत्येक डिटीएड विद्यालयात सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन बच्छाव यांनी दिली. यापूर्वी ही प्रक्रिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक येथेच होत होती. या २०१४-१५ शैक्षणिक वर्षापासून अध्यापन पदविका (डिटीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातून आवेदन पत्राची विक्री व स्वीकृती प्रत्येक डिटीएड विद्यालयातच सुरू करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यात न्यू इंग्लिश मीडियम अध्यापक विद्यालय, सोयगाव, मराठी अध्यापक विद्यापक विद्यालय, मालेगाव कॅम्प, के. बी.एच. अध्यापक विद्यालय, मालेगाव कॅम्प, खातून अध्यापक विद्यापक विद्यालय, मालेगाव, जे. ए. टी. अध्यापक विद्यापक विद्यालय, मालेगाव, पोतदार अध्यापक विद्यापक विद्यालय, टेहरे, अध्यापक विद्यापक विद्यालय, मुंगसे, अध्यापक विद्यापक विद्यालय, येसगाव बु. येथे अर्ज विक्री व स्वीकृतीची व्यवस्था करण्यात आले आहे. ही प्रक्रिया दि. २ ते १६ जून या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता या कार्यालयीन वेळेत होत आहे. अधिक माहितीसाठी संबंधित अध्यापक विद्यापक विद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)