इंदोरेच्या सरपंचपदी वर्षा कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:50 IST2021-02-18T22:37:22+5:302021-02-19T01:50:10+5:30
दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

इंदोरेच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या वर्षा धनराज कोरडे व उपसरपंच शिवाजी दरगोडे यांचा सत्कार करताना नरहरी झिरवाळ व मान्यवर.
दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी वर्षा धनराज कोरडे व उपसरपंचपदासाठी शिवाजी खंडेराव दरगोडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. निवड जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मच्छिंद्र बेंडकुळे, रोहिणी गवळी, पुष्पा धात्रक, प्रकाश वडजे उपस्थित होते.