अग्निरोधक कपाटामुळे कागदपत्रांची जपणूक
By Admin | Updated: January 11, 2016 23:01 IST2016-01-11T22:59:08+5:302016-01-11T23:01:35+5:30
मालेगाव : संरक्षण होण्याबरोबरच धुळीपासून सुटका

अग्निरोधक कपाटामुळे कागदपत्रांची जपणूक
मालेगाव : येथील महसूलच्या प्रांत व तहसील कार्यालयाला आवश्यक कागदपत्रांची (दस्तऐवज) जपणूक करण्यासाठी शासनाकडून अग्निरोधक कपाटे मिळाली आहेत. या कपाटांमुळे येथील कागदपत्रांचे संरक्षण होण्याबरोबरच धुळीपासून सुटका झाली आहे.
येथील प्रांत व तहसील कार्यालयात पुरातन दस्तऐवज ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने अनेक कागदपत्रे खराब होत होते. या कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून अग्निप्रतिबंधक कपाटे मिळाली आहेत. यात प्रांत कार्यालयाला
पाच, तर तहसीलला सात अशी
बारा कपाटे प्राप्त झाली आहेत.
या प्रत्येक कपाटात चार भाग
असून, त्यात प्रत्येकी पाच रकाने आहेत. या कपाटांना उघडण्यासाठी दोन कुलुपे असून, एकाला किल्ली लावण्याची व्यवस्था आहे. ही कपाटे हॅण्डलचा उपयोग करून उघडता येतात.
या कपाटांना तयार करताना अग्निपासून संरक्षण करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला असून, त्या पद्धतीने कपाटांची फिटिंग करण्यात आली आहे. ही कपाटे कुलूपबंद करण्याची व्यवस्था करण्यात आलेली असल्याने जबाबदार कर्मचाऱ्यांशिवाय यातील कागदपत्रे कोणालाही हाताळता येणार नाही.
येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील शंभर वर्षांचे दस्तऐवज आहेत. त्यांना वाळवी लागल्याने ते खराब होत होते. त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली असायची. यांच्या संरक्षणासाठी कोणतेही उपाय करण्यात आलेले नाही. या कागदपत्राचे स्कॅनिंग करण्यात आलेले नसल्याने काळाच्या ओघात ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. (प्रतिनिधी)