औंदाणे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:25 IST2020-01-27T23:36:02+5:302020-01-28T00:25:03+5:30
बागलाण तालुक्यातील औंदाणे येथे दारूबंदीचा ठराव महिलांच्या आक्रमक पवित्र्याने पारित करण्यात आला आहे. यामुळे रणरागिणींची एकजुटीमुळे ग्रामसभा वादळी ठरली.

औंदाणे येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करताना शेकडो महिला.
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथे दारूबंदीचा ठराव महिलांच्या आक्रमक पवित्र्याने पारित करण्यात आला आहे. यामुळे रणरागिणींची एकजुटीमुळे ग्रामसभा वादळी ठरली.
येथील महादेव मंदिरात उपसरपंच विजया निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. गावातील तरु ण व्यसनाधिन होत असल्याने व दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
यामुळे महिलांनी उग्ररूप धारण करत दारूबंदीसाठी ठराव करण्यासह गावातील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची मागणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी महिलांना अवैध दारू विक्र ीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत सदस्या शर्मिला गोसावी, नानाजी चव्हाण, शकुंतला नवरे, रवींद्र गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.