मद्यपींकडून तरुणावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: June 13, 2014 00:23 IST2014-06-12T01:10:14+5:302014-06-13T00:23:39+5:30
मद्यपींकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

मद्यपींकडून तरुणावर प्राणघातक हल्ला
पंचवटी : दारू पिण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने तिघा मद्यपींनी तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. गंगाघाटावर भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काहीशी धावपळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
यासंदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीसुनार रवि अण्णा उगले (२०), राजेश रवींद्र सूर्यवंशी (२०) पंचवटी व अभिजित दिलीप म्हैसधुणे (२१) सर्व राहणार रामवाडी हे गंगाघाटाजवळील एका शौचालयालगत मद्यपान करीत असताना, संतोष यशवंत ढोले (रा. रोहिणीनगर, पेठरोड) याने त्यांना या ठिकाणी दारू पिऊ नका असे सांगितले. याचा राग आल्याने या तिघांनी संतोष यास बेदम मारहाण केली. यातील संशयित राजेश सूर्यवंशी याने त्याच्याजवळील चाकूने पवार याच्या पोटावर सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन कोसळला, तर इतरांनी दारूच्या बाटल्या फोडून वार केले. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिनेस्टाईल पद्धतीने घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. या ठिकाणी अनेक गुंडांचे वास्तव्य असून, नेहमीच येथे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत असतात. कित्येकदा पर्यटकांनादेखील वेठीस धरले जाते. वाढत्या गुन्हेगारीवर वेळीच आवर घालावा, अशी मागणी येथील त्रस्त व्यापारी आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे. (वार्ताहर)