शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:30 IST

‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली.

सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली.सिडको, अंबडसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाची तयारी केली जात होती. सोमवारी सकाळपासून गल्ली, चौकांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा आवाज घुमला. ढोल, ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत गणेशभक्तांनी ठिकठिकाणी मिरवणुका काढून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. सिडकोत मौल्यवान गणपती मंडळांमध्ये एकता विविध विकास सेवा संस्था, पेलिकन बहुद्देशीय संस्था मंडळाचा समावेश आहे.मोठ्या गणपती मंडळांमध्ये सिडकोचा महाराजा मित्रमंडळ, शुभम पार्क मित्रमंडळ, राजे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळांचा समावेश आहे. या मंडळांनी ढोल, ताशांच्या गजरात मिरवणुका काढून श्रींची प्रतिष्ठापना केली. मोठ्या मंडळांच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, स्टेट बँक चौक, जुने सिडकोतील शॉपिंग सेंटर, भाजी मार्केट, दत्त चौक या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पूजेचे साहित्य, पुष्पहार, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती.देखाव्यांचे कामअंतिम टप्प्यातसिडको, अंबड परिसरात सार्वजनिक मित्रमंडळांकडून सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक देखावे तयार करण्याचे काम सुरू आहे. बहुतांश मंडळांचे देखावे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. देखावे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते युद्धपातळीवर काम करीत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत देखाव्यांचे काम पूर्ण होईल, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.इंदिरानगर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष व ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत इंदिरानगर व परिसरात श्री गणरायाचे सोमवारी उत्साहात आगमन झाले. सकाळपासूनच घराघरात आणि मंडळांमध्ये ‘श्रीं’च्या आगमनाची लगबग सुरू होती. पूजेचे साहित्य आणि श्रींची मूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.राणेनगर चौफुली येथील श्री गणरायाची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन युनिक ग्रुपच्या मैदानावर समारोप करण्यात आला. यावेळी श्री गणरायाची प्रतिष्ठापना सभागृहनेता सतीश सोनवणे व अनिता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. अजय मित्रमंडळाची श्रींची मिरवणूक जॉगिंग ट्रॅक येथून आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आली.शास्त्रीनगर, गजानन महाराज मंदिर, मोदकेश्वर चौक, बापू बंगला, सावरकर चौक मार्गे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रस्थानी तीन गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. तसेच महिलांच्या ढोल पथकाने व श्रींच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी यांसह नागरिक उपस्थित होते. श्री प्रतिष्ठान, इंदिरानगर उत्सव समिती, ज्ञानेश्वरनगर येथील छावा क्रांतिवीर सेना प्रणित शंभू नारायण ग्रुप, स्वा. वि. दा. सावरकर मित्रमंडळ या मंडळांनीही गणरायांची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात काढली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक