चांदोरी येथे औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:13 IST2021-05-04T00:13:08+5:302021-05-04T00:13:44+5:30

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चांदोरी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली.

Drug spraying at Chandori | चांदोरी येथे औषध फवारणी

चांदोरी गावात औषध फवारणी करताना आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक सोमनाथ कोटमे व सचिन कांबळे.

ठळक मुद्देचांदोरीत संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चांदोरी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली.

चांदोरीत संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी चांदोरी हे गाव निफाड तालुक्यात हॉस्टस्पॉट ठरत असल्याने आशा सेविका नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. त्याचबरोबर प्रतिबंधित क्षेत्रात व संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराइड औषध फवारणी करण्यात आली. ग्रामपालिका प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले असून, ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील सर्वच सदस्य बाधित होत असल्याने काही रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था चांदोरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य करीत आहेत.

 

Web Title: Drug spraying at Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.