जमियत उलेमातर्फे ‘नशामुक्त मालेगाव’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:44+5:302021-02-23T04:21:44+5:30

नशामुक्त अभियान राबविण्याच्या संदर्भात जमियतच्या पदाधिकाऱ्यांनी अपर पाेलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेत चर्चा केली. कुत्ता ...

'Drug Free Malegaon' Campaign by Jamiat Ulema | जमियत उलेमातर्फे ‘नशामुक्त मालेगाव’ अभियान

जमियत उलेमातर्फे ‘नशामुक्त मालेगाव’ अभियान

नशामुक्त अभियान राबविण्याच्या संदर्भात जमियतच्या पदाधिकाऱ्यांनी अपर पाेलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेत चर्चा केली. कुत्ता गाेली, मद्य, गांजा, हुक्का आदी स्वरूपाच्या व्यसनांत तरुणाई आहारी चालली आहे. कुत्ता गाेली, खाेकल्याच्या औषधांचा नशेसाठी हाेणारा वापर अत्यंत घातक ठरत आहे. नशेच्या आहारी गेलेले तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. अनेक स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. तरुण पिढी देशाचे भवितव्य आहे. ही पिढी अशीच व्यसनांत बरबाद झाली तर शहर व देशाचे माेठे नुकसान हाेणार आहे. त्यामुळे तरुणांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जमियत उलमा नशामुक्ती अभियान हाती घेत असल्याची माहिती आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी खांडवी यांना दिली. अभियानासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देण्याची विनंती करण्यात आली. खांडवी यांनी अभियानाचे काैतुक करत पाेलीस प्रशासन सहकार्य करेल, असे स्पष्ट केले. सध्या काेराेनाचा कहर वाढत असल्याने काही दिवसांनंतर अभियान सुरू केले जाणार आहे. यावेळी जमियतचे ॲड. निहाल लाेधी, अब्दुल मालिक बकरा, अनिस रहेमान, इम्तियाज इकबाल, माैलाना इमरान नदवी, हाजी मक्की, कारी जलिल आदी उपस्थित हाेते.

इन्फो

मशिदींमधून होणार आवाहन

तरुणांवर लक्ष देण्याची जबाबदारी कुटुंबप्रमुखांची आहे. प्रत्येक कुटुंबप्रमुखास या जबाबदारीचे भान करून देण्यासाठी मशिदींमधून आवाहन केले जाईल. धार्मिक दाखले देत व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. शहराच्या प्रमुख मार्गांवर फलक लावले जातील. पत्रके वाटून व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले जातील. शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुणांशी संवाद साधून जनजागृती केली जाणार असल्याचे आमदार मुफ्ती यांनी सांगितले.

Web Title: 'Drug Free Malegaon' Campaign by Jamiat Ulema