शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घास-बैल बाजारासाठी नाशकात ड्रग्जची ‘फॅक्टरी’; कल्याणचे खरेदीदार शोधण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 15:33 IST

कल्याणमधील बाजारात ‘माल’ खरेदी करणारा व पुढे पुणे, मुंबई, बंगळुरूसह नाशिकमध्ये पुरविणारा नेमका ‘धनी’ कोण हे शोधण्याचे मोठे आव्हान साकीनाका पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

नाशिकरोड : पुणे-मुंबई-नाशिक असा ‘सुवर्णत्रिकोण’ ड्रग्जमाफियांनीसुद्धा शोधून काढला आहे. कल्याणच्या घास-बैल बाजारात विक्री केले जाणारे ड्रग्ज नाशिकमधील फॅक्टरीचे असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासातून पुढे येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कल्याणमधील बाजारात ‘माल’ खरेदी करणारा व पुढे पुणे, मुंबई, बंगळुरूसह नाशिकमध्ये पुरविणारा नेमका ‘धनी’ कोण हे शोधण्याचे मोठे आव्हान साकीनाका पोलिसांपुढे उभे राहिले आहे. नाशिक शहराच्या वेशीवर पुणे महामार्गालगत शिंदे गावाच्या शिवारात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना जोरात चालविला जात होता. याबाबतची मोठी ‘लीड’ मुंबईच्या साकीनाका पोलिसांच्या हाती ‘रफिक’च्या माध्यमातून लागली. संशयित रफिक नामक व्यक्तीला उचलल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून साकीनाका पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन अमली पदार्थ बनवणारा कारखाना शोधून तो उद्ध्वस्त केला. 

तब्बल २५० कोटींपेक्षा जास्त किमतीचे १३३ किलो अमलीपदार्थ या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईनंतर नाशिक पोलिससुद्धा खडबडून जागे झाले आहेत. 

- या कारखान्यात बनवण्यात येणाऱ्या अमली पदार्थाची थेट नाशिकमध्ये विक्री न होता ते येथून कल्याणच्या घास-बैल बाजारात पाठविले जात होते व तेथून पुढे विविध शहरांमध्ये पेडलरमार्फत ते विक्री केले जात असल्याची माहिती  साकीनाका पोलिसांच्या तपासातून पुढे येत आहे.

- साकीनाका पोलिस कारवाई करून शुक्रवारीच नाशिकमधून परतले आहेत. हा कारखाना ड्रग्जमाफिया फरार ललित पाटीलचा भाऊ भूषण चालवित होता. तो केमिकल इंजिनिअर असल्याने त्याने अमलीपदार्थ तयार करण्याचा हा ‘उद्योग’ थाटला होता.

टॅग्स :Drugsअमली पदार्थkalyanकल्याणNashikनाशिकPoliceपोलिस