शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मक्याच्या पोंग्याला बाटलीतून औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:44 IST

लष्करी अळीचा प्रादुर्भाव : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ठळक मुद्देमक्याला दोनदा औषधांची फवारणी करून देखील लष्करी अळीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही

मानोरी : येवला तालुक्यात पाऊस मध्यम स्वरूपाचा पडत असला तरी यंदा मका पीक जगविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. तीस दिवसांच्या मकाला प्रति एकर पंधरा हजार रु पयांपेक्षा अधिक खर्च येत असून मक्याला दोनदा औषधांची फवारणी करून देखील लष्करी अळीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी वर्गाने एक लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून शेतातील प्रत्येक मक्याच्या झाडाच्या पोंग्यात औषध सोडण्याचा प्रयोग सुरू केला आहे.मकाच्या पोंग्यात थेट औषध टाकल्याने लष्करी अळीवर काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे. याआधी दोनदा औषध फवारणी करून झालेला खर्च पाण्यात गेला असून पाण्याच्या बाटलीचा औषध टाकण्यासाठीचा प्रयोग लाभदायक ठरतांना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच येवला तालुक्यात राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी लष्करी अळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी त्यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तीस दिवसांच्या मक्याला लष्करीअळीने घेरले असून या लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठी तीन वेळेला औषध फवारणी करूनही औषधे अधिक प्रमाणात कडवट असल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या चा-यावर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाड्यावस्त्यावर अद्यापही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतातील विहिरींना अद्याप त्याचा फायदा झालेला नाही.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी