शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावे जलपरिपूर्णतेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:05 IST

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसला नाही. मात्र मागील तीन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिल्यास अनेक दुष्काळी गावेही जलपरिपूर्ण झाली आहेत.

नाशिक : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसला नाही. मात्र मागील तीन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिल्यास अनेक दुष्काळी गावेही जलपरिपूर्ण झाली आहेत. यंदा १३७ गावांमध्ये १०० टक्के, तर १४६ गावांमध्ये ४६ टक्के गावे परिपूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्व कामे ३० टक्क्यांच्या पुढे झाली आहेत.गोहरण, डुबेरवाडी आदर्शजलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील डुबेरवाडी या गावाला उत्कृष्ट काम झाले आणि दुष्काळी तालुक्यातील या गावातील जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. चांदवडमधील गोहरण, आडगाव आणि वडगाव पंगू या गावांमध्येदेखील पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पिकाखालील तसेच सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. गावातील के.टी. वेअर आणि नालाबांध बंधाऱ्यामुळे पाणी जमिनीत मुरले आहे.जलयुक्त शिवार  कामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्रोतातील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणीNashikनाशिक