शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
4
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
5
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
6
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
7
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
8
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
9
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
10
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
11
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
12
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
13
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
14
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
15
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
17
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
18
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
19
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

धरणे तुडुंब : गोदावरीही वाहिली दुथडी भरून यंदा नाशकात १७० टक्के विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:16 IST

‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा घालू’ असे आर्जव करण्याची वेळ येईपर्यंत यंदाच्या मोसमात पाऊस नाशिक शहरात भरभरून कोसळला. यंदा पावसाळ्यात शहरात ११८५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती वार्षिक सरासरीच्या तुलनेत १७० टक्के इतकी विक्रमी नोंदविली गेली आहे.

नाशिक : ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा घालू’ असे आर्जव करण्याची वेळ येईपर्यंत यंदाच्या मोसमात पाऊस नाशिक शहरात भरभरून कोसळला. यंदा पावसाळ्यात शहरात ११८५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती वार्षिक सरासरीच्या तुलनेत १७० टक्के इतकी विक्रमी नोंदविली गेली आहे. सुमारे ९० हून अधिक दिवस कोसळणाºया पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९९ टक्के झाला आहे, तर गोदावरी नदीही यंदा ८ ते १० वेळा दुथडी भरून वाहताना पाहण्याचे भाग्य नाशिककरांच्या वाट्याला आले आहे.नाशिक शहरात वार्षिक सरासरी ६५० ते ७०० मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा, जून महिन्यापासूनच वरुणराजाने दाखविलेली कृपादृष्टी परतीच्या पावसापर्यंत कायम राहिली. यंदाच्या मोसमात नाशिक शहरात १ जूनपासून ते आतापर्यंत ११८५ मि.मी. पावसाची नोंद हवामान खात्याने नोंदवलेली आहे. त्यामुळे यंदा तब्बल १७० टक्के विक्रमी पाऊस झाला असून, पावसाचे दिवसही सर्वाधिक म्हणजे शंभरहून अधिक राहिले आहेत. सन २००५ मध्ये ११४८ मि.मी., २००६ मध्ये ११७५ मि.मी., २००७ मध्ये १०४५ मि.मी., २००८ मध्ये १०९७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर, पावसाने हजारापर्यंत सरासरी गाठली नव्हती. यंदा मात्र, पाऊस भरभरून मनसोक्त कोसळला. गणेशोत्सवासह नवरात्रोत्सवातही वरुणराजाने हजेरी लावली. दिवाळीच्या अगोदरपर्यंत पाऊस कोसळतच होता. तीन वर्षांपूर्वी गोदावरीला एकही पूर आलेला नव्हता. सर्वसाधारणपणे दर पावसाळ्यात सुमारे ३ ते ४ पूर गोदावरीला येतात. यंदा मात्र ८ ते १० वेळा गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहातील पाणीसाठाही ९९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. दारणा धरणही शंभर टक्के भरले आहे. यंदा प्रथमच गंगापूर धरण समूहातून तब्बल ७० टीएमसी पाणी हे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे, दरवर्षी होणारा नाशिक-नगर-मराठवाड्याचा पाणीतंटा यंदा होण्याची सुतराम शक्यता नाही. यंदा भरघोस पर्जन्यमान झाल्याने नाशिक महापालिका सुखावली असून, यंदा जलसंपदा विभागाकडे ४६०० द.ल.घ.फू. पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे होणाºया बैठकीत पाणी आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल.