पाणीटंचाई प्रश्नी येवलेकरांना दिलासा
By Admin | Updated: May 27, 2014 17:00 IST2014-05-27T00:40:36+5:302014-05-27T17:00:28+5:30
पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे.

पाणीटंचाई प्रश्नी येवलेकरांना दिलासा
येवला : तालुक्यात यंदा पाणीटंचाई प्रश्न मागील वर्षीच्या तुलनेत कमी भेडसावत असून, केवळ १४ गावे व नऊ वाड्यांना, सहा टँकरद्वारा पाणीटंचाई प्रश्नी येवलेकरांना दिलासापाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी २८ मेपर्यंत ४९ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती व तब्बल २५ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला गेला होता. ३८ गाव पाणीपुरवठ्यासह पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे. येवला पंचायत समिती प्रशासनाने सन २०१३-१४ साठी पाणीटंचाई कृती नियोजन आराखड्यात तिसर्या टप्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ५४ गावे व ३३ वाड्या अशा एकूण ८७ ठिकाणी पाणी पोहचवावे लागेल असे नियोजन केले होते. परंतु या नियोजनात ५४ प्रस्तावित गावांपैकी केवळ १४ गावांना, तर ३३ वाड्यांपैकी केवळ सहा वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती आहे. प्रशासनाने गृहीत धरलेल्या गावांपैकी केवळ २५ टक्के गावे, २० टक्के वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे लागले. तालुक्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत निश्चित सुधारणा झाल्याची आकडेवारी आहे. सध्या खैरगव्हाण, तांदूळवाडी, गोपाळवाडी या तीन ठिकाणची पाणी टँकर मागणी येवला पंचायत समितीकडे आली आहे. येत्या दोन दिवसांत टँकर मंजुरीचे अधिकारही स्थानिक प्रांत कार्यालयाकडे येण्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. यामुळे गावांकडून मागणी आली की, तत्काळ सर्वे व प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक तेथे टँकर अशी भूमिका तहसीलदार शरद मंडलिक यांची आहे.