दुष्कर्म वाढल्याने दुष्काळ-अतिवृष्टी
By Admin | Updated: July 17, 2014 00:33 IST2014-07-16T23:44:31+5:302014-07-17T00:33:15+5:30
दुष्कर्म वाढल्याने दुष्काळ-अतिवृष्टी

दुष्कर्म वाढल्याने दुष्काळ-अतिवृष्टी
उमराणे : समाजात देशात, जगात दिवसेंदिवस पाप वाढत चालले आहे. अनिती, दुष्कर्म, भ्रष्टाचार यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यानेच व परमेश्वरावरची श्रद्धा कमी होत चालल्यानेच परमेश्वराचा प्रकोप वाढत असून जगात आज सगळीकडे अतिवृष्टी, दुष्काळ, धान्याची, विजेची कमतरता आदि समस्या वाढत चालल्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत जैनाचार्य देवनंदीजी महाराज यांनी केले.
माळसाने, ता. चांदवड येथे णमोकार तीर्थाची निर्मितीचा शुभारंभ झाला. तीर्थावर पहिला चार्तुमासाचा कलश स्थापना गुरूपौर्णिमच्या शुभदिनी करण्यात आली. चातुर्मास कलश स्थापनेचा मान अतिशय क्षेत्र कचनेरजीचे महामंत्री मनोजकुमार साहूजी यांच्या परिवाराने मिळवला. णमोकार तीर्थकलश स्थापनेचा मान णमोकार तीर्थरक्षा कमेटीचे अध्यक्ष निलमकुमार अजमेरा यांना मिळाला. आचार्यश्रींना जीनवाणी देण्याचा मान नागपूर येथील संघपती संतोष जैन यांना मिळाला. साधु-साध्वी श्रावण श्राविका यांच्यासाठी हा पर्वकाळ आहे. ह्या काळाला जास्तीत जास्त धर्मआराधना, स्वाध्याय, जपतप करुन आत्मकल्याण साधले पाहिजे. णमोकार तीर्थाची निर्मिती ही फक्त मंदिरासाठी नसून नॉलेजसिटी बनवून त्यातून संस्कार मंदिराच्या माध्यमातून भावीपिढी संस्कारक्षम बनविण्याचे कार्य त्यातून केले जाणार आहे, असे देवनंदीजी महाराज म्हणाले. ह्याप्रसंगी विश्वशांती व प्रजन्यवृष्टी व्हावी यासाठी संपन्न झालेल्या सिद्धचक्रविधानाची समाप्ती झाली. कार्यक्रमास देशाच्या विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)