दुष्काळ एक, बैठका दोनपदाधिकारी-प्रशासनाचा असाही आढावा
By Admin | Updated: October 21, 2015 23:21 IST2015-10-21T23:21:02+5:302015-10-21T23:21:33+5:30
दुष्काळ एक, बैठका दोनपदाधिकारी-प्रशासनाचा असाही आढावा

दुष्काळ एक, बैठका दोनपदाधिकारी-प्रशासनाचा असाही आढावा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभारात सत्ताधाऱ्यांमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष थेट राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलेला असतानाच आता पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातही समन्वयाचा ‘अभाव’ असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.
काल (दि.२१) जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळासह विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या दोन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचे चित्र होते. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी त्यांच्या कक्षात जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेत त्यांना विकासकामे मार्गी लावण्याबरोबरच दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना केल्या. तर दुसरीकडे नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनीही गटविकास अधिकारी, लघुपाटबंधारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेत दुष्काळ व टंचाईच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सूचना केल्या. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी त्यांच्या कक्षात घेतलेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांकडून इंदिरा व रमाई घरकुल आवास योजना, जन्म-मृत्यूचे ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणारे दाखले. तेरावा वित्त आयोगाचा तपशीलवार खर्च याबाबत आढावा घेतला. निमगाव वाकडा, पाटोदा व जोगमोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याबाबत प्रशासनाला विचारणा केली. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषगांने टंचाई आराखड्याचे नियोजन करण्याबाबत सादरीकरण करण्यास सांगितले असता फक्त चांदवड पंचायत समितीचे सादरीकरण करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी कुपोषण व शालेय शिक्षणाबाबत आढावा घेतला. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी
आदि उपस्थित होते. दुसरीकडे विस्तारित प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्ह्यातील दुष्काळ व टंचाईबाबत तब्बल सात ते आठ तास आढावा घेतला. (प्रतिनिधी)