सायगावला दुष्काळी परिषद
By Admin | Updated: September 5, 2015 22:08 IST2015-09-05T22:07:40+5:302015-09-05T22:08:16+5:30
सायगावला दुष्काळी परिषद

सायगावला दुष्काळी परिषद
येवला : महाराष्ट्रशासन येवला तालुका दुष्काळी जाहीर करीत नाही तोपर्यंत येवला तालुक्यात जनआंदोलनाचा लढा सुरूच राहील शेवटच्या क्षणापर्यंत सर्वसामान्य शेतकरी,व शेतमजुराच्या गंभीर प्रश्नावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यांचा प्रश्न हाच माझा पक्ष असेल यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जनांदोलन करावे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दुष्काळी शेतकरी परिषदेचे प्रमुख वक्ते आप्पासाहेब कदम यांनी दिला.
सायगाव येथे शनिवारी दुष्काळी शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अॅड.सुभाष भालेराव होते.यावेळी कदम म्हणाले,शासनाने येवला तालुका दुष्काळी जाहीर करावा .या प्रसंगी ५ ठराव परिषदेत संमत करण्यात आले. जनावरांना पाणी चारा नाही म्हणून तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी ठरावाद्वारे केली. अंगुलगाव येथे पुढील दुष्काळी मेळावा १३ सप्टेंबरला आयोजित केला आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी अॅड.सुभाष भालेराव यांनी सांगितले कि शासनाला जागे करण्यासाठी एकत्रीत राहून मदत करण्यास भाग पडावे. परिषदेसाठी विष्णू कुळधर,गोधाजी पाटील,दिनकर लोहकरे , बबन बारे,वसंत खैरनार जयवंत मोरे,बद्री कोल्हे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी श्रीराम पाटील शिंदे,तात्या लहरे,गणपत खैरनार ,दादा नेहे,राम घोडके,गोरख साताळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. (वार्ताहर)