शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यात दम ‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 15:08 IST

शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर मध्यरात्रीपासून कायम आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवातबळीराजाला मोठा दिलासा लाभला गोदापात्रात २७८ क्यूसेक पाणी प्रवाहित

नाशिक : शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाला दमदार सुरुवात झाल्याने बळीराजासह सर्वच सुखावले आहे. मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने नागरिक हवालदिल झाले होते. हवामान खात्याकडून गुरुवारपर्यंत उत्तर-मध्य महाराष्टÑात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवस कोरडे गेले; मात्र गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात २४ मिमीपर्यंत पाऊस मोजला गेला. शहरातसुद्धा हलक्या व मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने जनजीवन काहीसे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर मध्यरात्रीपासून कायम आहे. दिंडोरी-७७, निफाड-५७, इगतपुरी-४६, पेठ-४६, त्र्यंबक-२३, बागलाण-२७ मिमी इतका पाऊस आज सकाळी ६ वाजेपर्यंत पडला. जिल्ह्यात सरासरी २४.६४ मिमी असा गुरुवारी पाऊस मोजला गेला. आतापर्यंत जिल्ह्याच्या पर्जन्यमान एकूण सरासरी ५२८.४२ मिमी असा राहिला आहे.

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. गंगापूर धरणाच्या परिसरात ३४, कश्यपी-३६,गौतमी-३४, त्र्यंबक-२४, अंबोली-४३ मिमी इतका पाऊस आज सकाळी ६ वाजेपर्यंत मोजला गेला. गंगापूर धरणात नव्याने ३८ दलघफू इतके पूरपाणी वाढले. यामुळे धरणाचा जलसाठा सकाळी ५२.६६ टक्के इतका झाला. आंबोली भागात पावसाचा जोर चांगला राहिला. दारणा धरणातून सकाळी १२०० क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच भावलीमधून ७०१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.शहरात सकाळपासून ढगाळ हवामान कायम असून, पावसाची रिपरिपदेखील सुरू आहे. शहरातील अहिल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे गोदापात्रात २७८ क्यूसेक पाणी प्रवाहित आहे.
रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. पावसाच्या संततधारेमुळे रिंगरोडसह शहराच्या बहुतांश रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकgodavariगोदावरीgangapur damगंगापूर धरणnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वर