वाहनाची धडक; एकाचा मृत्यू
By Admin | Updated: January 30, 2016 23:54 IST2016-01-30T23:52:56+5:302016-01-30T23:54:49+5:30
वाहनाची धडक; एकाचा मृत्यू

वाहनाची धडक; एकाचा मृत्यू
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) सकाळच्या सुमारास घडली़
मयत इसमाचे नाव विजय मधुसुदन देशमुख असे आहे़ वाहनाने दिलेल्या धडकेत देशमुख हे गंभीर जखमी झाले होते़ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ गेल्या काही दिवसांपासून मुंबई-आग्रा महामार्गवर अपघाताचे प्रमाण वाढले असून, यात वाहनधारक जखमी होऊन बळींचे प्रमाणही वाढले आहे. (प्रतिनिधी)