रिव्हॉल्वरचा धाक दाखवून वाहन पळविले
By Admin | Updated: April 10, 2017 16:35 IST2017-04-10T16:35:39+5:302017-04-10T16:35:39+5:30
ठाणे येथून नाशिककडे येणाऱ्या एका वाहनात प्रवाशी म्हणून बसलेल्या चौघांनी चालकाला रिव्हॉल्वरचा धाक

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून वाहन पळविले
नाशिक : ठाणे येथून नाशिककडे येणाऱ्या एका वाहनात प्रवाशी म्हणून बसलेल्या चौघांनी चालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील वाहन पळवून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातपूर नाशिक येथील महेंद्र साबळे हे हिरावाडी नाशिक येथील अरुणा साहेबराव पवार यांच्या एम.एच.41. व्ही.7516 या झेष्ट वाहनावर चालक आहेत. रविवारी दुपारी ते अरुणा पवार यांच्या बहीण व मेव्हणे यांना सोडण्यासाठी ठाणे येथे गेले होते.त्यांना घरी सोडून ते पुन्हा नाशिककडे परतत असताना कल्याण जवळील भिवंडी बायपास येथे लघवी करण्यासाठी थांबले असता.चार इसमानी आम्हाला नाशिकला जायचे आहे असून सांगून भाडेतत्वावर गाडीत बसले. ही गाडी घोटी टोलनाका पार केल्यानंतर सिन्नर चौफुलीवर या चौघांनी गाडी थांबविण्यास सांगितले.गाडी थांबल्यानंतर मागील सीटवर बसलेल्या इसमानी चालकाला पाठीमागील सीटवर ओढून घेत त्याला रिव्हॉल्वरचा धाक दाखवीत हे वाहन पळवून नेले.
दरम्यान या चौघांनी चालक महेंद्र साबळे याला संगमनेरजवळ एका निर्जनस्थळी सोडून दिले.चालकाने पायपीट करीत संगमनेर गाठीत नाशिकला येत आपल्या मालकाला घटनेची माहिती दिली व आज घोटी गाठून याबाबतची फिर्याद दिली.
याबाबत घोटी पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहे.