वाहतूक पोलिसासोबत वाहनचालकाची अरेरावी

By Admin | Updated: September 9, 2016 02:02 IST2016-09-09T02:02:25+5:302016-09-09T02:02:37+5:30

वाहतूक पोलिसासोबत वाहनचालकाची अरेरावी

Driving motor vehicle with traffic police | वाहतूक पोलिसासोबत वाहनचालकाची अरेरावी

वाहतूक पोलिसासोबत वाहनचालकाची अरेरावी

 नाशिक : पंचवटी परिसरातील सेवाकुंज सिग्नलवर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसासोबत एका अल्पवयीन वाहनचालकाने अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सेवाकुंज सिग्नल येथे शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी काका तुकाराम काळे हे वाहतुकीचे नियोजन करीत असताना निमाणीकडून भरधाव वेगाने येणारी इनोव्हा मोटार (एमएच १५, इएल २०२०) काळे यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने वाहन न थांबविता अधिक वेगाने एका खासगी शाळेच्या दिशेने नेले.
यावेळी त्यांनी वाहनचालकाची चौकशी केली असता या अल्पवयीन वाहनचालकाकडे परवाना आढळून आला नाही. काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Driving motor vehicle with traffic police