शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर घाटात कंटनेर उलटून अपघात ; वाहन चालक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:48 IST

सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील कंपनीतून मुंबईला माल घेऊन जाणारा कंटेनर सिन्नर घाटात दुभाजकामध्ये उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

ठळक मुद्देसिन्नर घाटात अपघात वाहनचालक जखमी ;क्लिनर बचावला

नाशिक : सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील सुजित इंडस्ट्रीज कंपनीतून मुंबईला माल घेऊन जाणारा कंटेनर सिन्नर घाटात दुभाजकामध्ये उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.पिंपरी चिंचवड येथील अनील कार्गो कंपनीचा कंटेनर एम एच 14 एच जी 1330 हा सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील सुजित इंडस्ट्री मधून माल घेऊन गुरुवारी (दि.11) दुपारी मुंबईला जाण्यासाठी निघाला होता.

 हा कंटेनर नाशिककडे येत असताना सिन्नरचा घाट उतरल्यानंतर चालकाचे वाहनावरील निंयत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या दुभाजकामध्ये उलटला. या अपघातात कंटेनर मधील क्लीनर गाडी बाहेर फेकल्याने कोणतीही दुखापत झाली नाही.  मात्र कंटेनर चालक हा गाडीतच अडकून पडला होता. अपघात होताच घटनास्थळी येणारे जाणारे वाहनचालक थांबल्याने मोठी गर्दी झाली होती. सिन्नर व महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जमा झालेल्या नागरिकांनी मोठ्या क्रेनच्या साह्याने कंटेनरला सरळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. अखेर नागरिकांनी कंटेनरची पुढील काच व दरवाजा तोडून जखमी चालकास बाहेर काढले. त्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.  दरम्यान, कंटेनर दुभाजकामध्ये पलटी झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीला कोणताही अडसर निर्माण झाला नसल्याने वाहतूक सुरू होती. कंटेनर चालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी