दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

By Admin | Updated: October 25, 2015 22:32 IST2015-10-25T22:31:48+5:302015-10-25T22:32:20+5:30

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

Driver dies in bike accident | दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

चांदवड : येथील तहसीलदार मनोज देशमुख यांच्या गाडीच्या चालक हे दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला इंडिगो कारने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले.
रविवारी दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास तहसीलदाराच्या वाहनाचे चालक मोहन ब्यंकटलाल व्यास (४५), रा. चांदवड हे काळी पल्सर या दुचाकीवरून (क्रमांक एमएच १५ / सीएक्स 0२१४) हॉटेल सलीम समोरचा रस्ता ओलांडत असताना मालेगावकडून नाशिककडे जाणार्‍या इंडिगो कारने (क्रमांक एमएच. ४१ / सी. ८0९२) त्यांना धडक दिल्याने मोहन ब्यंकटलाल व्यास हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पिंपळगाव येथील रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचे निधन झाले. चांदवड येथे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची सभा संपल्यानंतर व्यास हे हेलीपॅडकडे जात असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चांदवड पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, चंद्रकांत निकम हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Driver dies in bike accident