चालक, प्रवाशांना मारहाण करून रिक्षा लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST2021-04-04T04:14:54+5:302021-04-04T04:14:54+5:30

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत रिक्षाचालक व प्रवाशांना मारहाण करीत चालकाच्या ताब्यातील रिक्षा, त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल अज्ञात ...

The driver beat the passengers and dragged the rickshaw away | चालक, प्रवाशांना मारहाण करून रिक्षा लांबविली

चालक, प्रवाशांना मारहाण करून रिक्षा लांबविली

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत रिक्षाचालक व प्रवाशांना मारहाण करीत चालकाच्या ताब्यातील रिक्षा, त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेल्याची घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. नसीर युनूस खान (वय ३२), रा. राजवाडा, देवळाली गाव हा मुसळगाव औद्योगिक वसाहतीत प्रवाशांसह रिक्षा (एमएच १५ यू ०४२४) चालवीत होता. त्यावेळी दुचाकीहून आलेल्या तीन युवकांनी धुमाळ कंपनीजवळ रिक्षा अडविली. एका युवकाने रिक्षाचालकाचे हात धरले. दुसऱ्याने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड मारला; तर तिसऱ्या चोरट्याने काठीने रिक्षाचालकावर हल्ला केला. रिक्षाचालकाच्या खिशातील एक हजार ५०० रुपये रोख, मोबाईल चोरट्यांनी काढून घेतला. त्यानंतर रिक्षातील प्रवाशांकडे पैशांची मागणी केली. प्रवाशांकडे पैसे नसल्याने त्यांनाही मारहाण करीत चोरट्यांनी रिक्षा घेऊन पोबारा केला. रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याने त्याला उपचारांसाठी सिन्नर नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश कराड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The driver beat the passengers and dragged the rickshaw away