वाळलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी
By Admin | Updated: January 21, 2016 23:01 IST2016-01-21T23:00:25+5:302016-01-21T23:01:44+5:30
वाळलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी

वाळलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी
येवला : भयानक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरे जगली पाहिजे या हेतूने सुमारे २० ते २५ हजार रु पये किमतीचा जनावरांसाठी साठवून ठेवलेला वाळलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
येवला शहरातील बदापूर रस्त्यावरील रोकडे हनुमान मंदिरालगत शरद श्यामराव शिंदे यांनी भविष्यातील चाराटंचाई लक्षात घेऊन सुमारे २० ते २५ हजार रु पये किमतीचा पाच ट्रॅक्टर वाळलेला चारा विकत घेऊन जनावरांसाठी साठवून ठेवला
होता.
गुरु वारी सायंकाळी ५ च्या सुमारास या चाऱ्याला अचानक आग लागली. आग लागल्याने तत्काळ येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. चारा वाळलेला असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले व त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली
नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.
येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी तुषार लोणारी, फायरमन कृष्णा गुंजाळ यांच्यासह वस्तीलगतच्या सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत शिताफीने ही आग विझवली. येवला येथे रोकडे हुनमान येथे शरद शिंदे यांच्या चाऱ्याला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे जवाऩ