गडाख विद्यालयात वेषभूषा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:04+5:302021-09-21T04:16:04+5:30
दरवर्षी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांंचे आयोजन केले जाते. गणेश उत्सवाचे औचित्य साधत सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख ...

गडाख विद्यालयात वेषभूषा स्पर्धा
दरवर्षी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांंचे आयोजन केले जाते. गणेश उत्सवाचे औचित्य साधत सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालयात तीन दिवसीय ऑनलाइन आनंदोत्सव कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, समाज सुधारक, क्रांतिकारक, संत- महापुरुष, देवी-देवता, विविध व्यावसायिक, शेतकरी अशा वेशभूषा साकारल्या होत्या. संकल्पनेतून या चिमुरड्यांनी कोरोना, निसर्ग, पर्यावरण, स्त्री-रक्षण अशा अनेक विषयावर सामाजिक संदेश दिले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे राजेश गडाख यांनी सांगितले. या ऑनलाईन कार्यक्रमात विद्यालयातील ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील उत्सव शिक्षक समिती नलिनी लोखंडे, विनायक पगार, मयुरी हिवरडे, शीतल नाजगड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शांताबाई शिंदे , राजेंद्र गडाख, विश्वनाथ शिरोळे, सूर्यकांत खुळे, शुभम गडाख यांनी काम पाहिले.