विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:26+5:302021-01-13T04:36:26+5:30
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राजेंद्र गोविंद सोनवणे (रा. मराठानगर, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २१ नोव्हेंबर ते ...

विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राजेंद्र गोविंद सोनवणे (रा. मराठानगर, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२० या कालावधीत दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आले व जर्मनीत जाऊन उच्चशिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले ‘आयईएलटीएस’ परीक्षेचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक ती कागदपत्रे मिळवून देण्याचे आश्वासन समोरच्या भामट्याने दिले. त्यासाठी त्याने पैशांची मागणी केली. प्रमाणपत्र थेट मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत सोनवणे यांनी त्या अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करत सुमारे ७ लाख ६ हजार ८३८ रुपये ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे पाठविले. यानंतर संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पाेलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. दरम्यान, सोनवणे यास ज्या दोन कमांकांवरून फोन आले ते उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून तंत्रविश्लेषण शाखेच्या माध्यमातून केला जात आहे.