कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून नाट्यपर्वणी

By Admin | Updated: September 29, 2015 23:00 IST2015-09-29T22:59:42+5:302015-09-29T23:00:56+5:30

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून नाट्यपर्वणी

The drama of the Kusumagraj establishment from tomorrow | कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून नाट्यपर्वणी

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून नाट्यपर्वणी

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित ‘नाट्य अभ्यासवर्ग ३’ या उपक्रमाअंतर्गत येत्या गुरुवारपासून (दि. १ आॅक्टोबर) प्रगट मुलाखत, लेख अभिवाचन व दृकश्राव्य व्याख्यान अशा तीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने रसिकांना नाट्यपर्वणीच लाभणार आहे.
दि. १ रोजी सायंकाळी ७ वाजता विशाखा सभागृहात नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या प्रगट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकेश शेवडे, रश्मी काळोखे व अभिषेक रहाळकर हे मुलाखत घेतील. पेठे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ या पुस्तकाच्या निमित्ताने या गप्पा रंगणार आहेत. शनिवारी (दि. ३ आॅक्टोबर) सायंकाळी ७ वाजता स्वगत सभागृहात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘त्रिबंध’ या ललित लेखसंग्रहातील ‘यथा काष्टं च काष्टं च’ या लेखाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. दिग्दर्शक व अभिनेते मोहित टाकळकर हे अभिवाचन करतील. पुण्याच्या ‘आसक्त’ या संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. रविवारी (दि. ४ आॅक्टोबर) सायंकाळी ६ वाजता स्वगत सभागृहात ‘समकालीन भारतीय रंगभूमी : एक दृष्टिक्षेप’ या विषयावर नाटककार आशुतोष पोतदार यांचे दृकश्राव्य व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हे सर्वांसाठी खुले असून, रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The drama of the Kusumagraj establishment from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.