नाटक हा साहित्य प्रकाराचा गाभा
By Admin | Updated: October 21, 2015 22:12 IST2015-10-21T22:11:35+5:302015-10-21T22:12:24+5:30
नाटक हा साहित्य प्रकाराचा गाभा

नाटक हा साहित्य प्रकाराचा गाभा
नाशिकरोड : नाटक हा सामुदायिक कलाप्रकार असून, यात दिग्दर्शकासह कलाकार,निर्माता, नेपथ्यकार आदिंच्या समन्वयातून सर्वांगसुंदर कलाकृती साकारली जाते. नाटक हा वाङ्मय प्रकार सर्व साहित्याचा गाभा मानला जातो, असे प्रतिपादन प्रा. इंदिरा आठवले यांनी केले.
बिटको महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. आठवले बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य राम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अंजली गौतम आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कविवर्य वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. विजया धनेश्वर व आभार प्रा. के. एम. लोखंडे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. विद्युल्लता हांडे, प्रा. सुनीता सताळे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)